मनमाडला भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी

By Admin | Updated: February 13, 2017 00:16 IST2017-02-13T00:15:29+5:302017-02-13T00:16:39+5:30

शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप

Holi celebrations of BJP's manifesto in Manmad | मनमाडला भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी

मनमाडला भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी

 मनमाड : भाजपाकडून उत्तर प्रदेश निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आमिष दाखवून त्यांची क्रूर थट्टा केली असल्याच्या निषेधार्थ मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने येथील एकात्मता चौकात भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.
राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे पिचलेला असताना भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या वेळी संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधून प्रसंगी सरकार-मधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. येथील आश्वासनांची पूर्तता झालेली नसताना भाजपाने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत जाहीरनाम्यात कर्जमाफीचा मुद्दा घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी येथील एकात्मता चौकात भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी केली. यावेळी माजी आमदार राजाभाऊ देशमुख,मनमाड अल्ताफ खान, शहर प्रमुख मयूर बोरसे , संजय कटारिया नगरसेवक प्रमोद पाचोरकर, कैलास गवळी, दिलीप भाबड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Holi celebrations of BJP's manifesto in Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.