मालेगाव युवा संघटनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:23 IST2020-02-17T22:50:06+5:302020-02-18T00:23:17+5:30
नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे सुभाष टॉकीजसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मालेगावी युवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी आंदोलनकर्ते देवा पाटील, निखिल पवार, कलीम अब्दुल्ला यांना रस्ते दुरूस्तीचे लेखी आश्वासन देताना नगरसेविका ज्योती भोसले, प्रभाग अधिकारी सुनील खडके.
मालेगाव : नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे सुभाष टॉकीजसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
क्रीडा संकुलपासून बाफना ज्वेलर्सपर्यंतचा रस्ता ठेकेदाराकडून पुन्हा करवून घेण्यासाठी एक दिवसीय आंदोलन क्र ीडा संकुल येथे केले होते त्यावेळी शहर अभियंता यांनी लेखी आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही. यावेळी देवा पाटील, निखिल पवार, सुशांत कुलकर्णी, शेखर पगार, विवेक वारुळे, यशवंत खैरनार, निंबा पाटील, पोपट अहिरे, मनोहर यादव, अंबादास येशी, पांडुरंग बोरसे, राजेंद्र गवळी, सुभाष अहिरे, बाळासाहेब ढोले, अनिल सोनवणे, नारायण पगारे, कैलास शर्मा, अतुल लोढा, विजय दशपुते, राजेंद्र पाटील, एकनाथ शिंदे, प्रभाकर देवरे, प्रदीप जैन, प्रमोद भावसार आदी उपस्थित होते. मालेगावी कॅम्परोडवर मालेगाव युवा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास्थळी प्रभाग अधिकारी सुनील खडके, नगरसेविका ज्योती भोसले यांनी भेट दिली. त्यांनी एका महिन्यात प्रभागातील रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.