नाशिक : महापालिकेच्या आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट सेवा दल आणि शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच यांच्या वतीने नुकतेच छंद वर्ग शिबिर घेण्यात आले.महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे तसेच जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. या शिबिरात मुलांना कराटे प्रशिक्षक प्रणव कमोद व सचिन पवार यांनी मार्गदर्शन केले. मुलांना भेटकार्ड बनविणे, आकाशकंदील तयार करणे, लोकरीची व क्रेप कागदाची फुले तयार करणे, मुखवटे तयार करणे ही कला मनांजली शुक्ल व प्रगती जाधव यांनी शिकवली.तसेच समूहनृत्य, समूहगीत शिकविण्यात आले. तसेच स्वच्छतेबाबत पथनाट्याबाबत हर्षल पाटील, दीपू सैनी यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छतेचे मूल्य शिक्षण याविषयी संध्याताई नावरेकर व डॉ. हेमा काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वसंत एकबोटे, मंजूषा जोशी, ज्योती भोसले यांच्यासह विलास सूर्यवंशी, नानाजी गांगुर्डे, शरद खाडे, मुख्याध्यापक कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.स्वसंरक्षणासाठी कराटे आवश्यक : उदय देवरेदहा दिवस चालेल्या या शिबिरात सुमारे साठ मुला-मुलींनी सहभाग घेतला. मुलींना स्व-संरक्षणासाठी कराटे आवश्यकच आहे, असे सांगताना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी शाळेस क्रीडा साहित्य देण्याचे तसेच खेळांसाठी प्रशिक्षक देण्याचे जाहीर केले. उदय देवरे यांनी यापुढे अशाप्रकारच्या शिबिरांसाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
महानगरपालिका शाळांमधील मुलांसाठी छंद वर्ग कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:18 IST