पाटणे येथे बैल पूजनाने पोळा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:53+5:302021-09-07T04:18:53+5:30

प्रगतशील शेतकरी विश्वनाथ खैरनार यांच्या मानाच्या बैलाची पूजा सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली. नितीन सोनवणे ...

Hive celebration with bull worship at Patne | पाटणे येथे बैल पूजनाने पोळा साजरा

पाटणे येथे बैल पूजनाने पोळा साजरा

प्रगतशील शेतकरी विश्वनाथ खैरनार यांच्या मानाच्या बैलाची पूजा सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आली. नितीन सोनवणे यांच्या मानाच्या बैलाचे पूजन पोलीस पाटील रवींद्र खैरनार यांनी केले. यावेळी माजी सरपंच नथू खैरनार, संदेश खैरनार, सुभाष अहिरे,तुषार वाघ, माजी उपसरपंच जितेंद्र खैरनार , स्वप्निल पवार , पोलीस पाटील रवींद्र खैरनार, अशोक वाघ, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, कैलास शेवाळे, कमलाकर खैरनार, कैलास खैरनार, राजेश धनवट,चंदू अहिरे तसेच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी घरोघरी सुवासिनींनी बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना मारुती मंदिराकडे नेऊन गावात फेरी मारली. कोरोनाचे सावट असूनही बळीराजाने लाडक्या बैलांचा सण उत्साहात साजरा केला.

Web Title: Hive celebration with bull worship at Patne