हायटेक कुरापत बनली फसवेगिरी
By Admin | Updated: October 16, 2014 01:23 IST2014-10-15T23:17:32+5:302014-10-16T01:23:00+5:30
हायटेक कुरापत बनली फसवेगिरी

हायटेक कुरापत बनली फसवेगिरी
नाशिक, दि. १५ - इंटरनेटमध्ये उपलब्ध वेबसाईट व अॅप्सद्वारे आज कोणीही दुसऱ्यांचे प्रोफाईल व वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करून संकट ओढवून घेत आहे. याचे एक माध्यम इंटरनेट बनले आहे. याद्वारे स्पूफिंग कॉल आणि फेक एसएमएस सर्व्हिस एक अशी सुविधा आहे, की ज्यात कुठलाही क्रमांक फिड करून त्याला कॉल व मेसेज करता येतो. इतरांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर फेक कॉल करण्यासाठी केला जात आहे. ठगण्यासाठी केला जातो वापर
शहरातील काही नागरिकांना त्यांच्याच मोबाईल क्रमांकावरून कॉल येत आहेत व सांगण्यात येते की, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे. काही भामटे आता इंटरनेटद्वारे मोबाईल क्रमांकाचा डेटा मिळवून स्पूफिंग कॉल करीत आहेत.
कुरापत येईल अंगलट
शहरातील अनेक नागरिकांनी आम्हाला कोटींचे बक्षीस मिळाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आहे. अनेकांनी तर कॉल आल्याचेदेखील सांगितले. दिवाळीचे बक्षीस तुम्हाला मिळणार, असेही फेक कॉल नागरिकांना येत आहेत. काही हायटेक कुरापतखोर इतरांच्या मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग करीत आहेत.
अॅप्सपण कारणीभूत...
आपला मोबाईल नंबर शेअरिंगसाठी मोबाईल अॅप्सदेखील कारणीभूत ठरत आहेत. कुठल्याही अॅप्सला इन्स्टॉल करण्याअगोदर त्या अॅप्सची पूर्ण माहिती मिळवायला हवी. काही अॅप्स डाऊनलोड केल्यामुळे आपली वैयक्तिक माहिती इंटरनेटवर सेव्ह होते, त्यामुळे अॅप्स डाऊनलोड करणे धोकादायक ठरले आहे.