पावसाचा द्राक्षबागांसह कांद्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 02:02 PM2019-10-23T14:02:19+5:302019-10-23T14:02:31+5:30

पांडाणे/ ब्राह्मणगाव : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, अंबानेर , सागपाडा जिरवाडे , मांदाणे , परिसरात अतिवृष्टीने द्राक्ष, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Hit the onion with the rainy vine | पावसाचा द्राक्षबागांसह कांद्याला फटका

पावसाचा द्राक्षबागांसह कांद्याला फटका

Next

पांडाणे/ ब्राह्मणगाव : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, अंबानेर , सागपाडा जिरवाडे , मांदाणे , परिसरात अतिवृष्टीने द्राक्ष, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिंडोरी तालुका हा द्राक्ष पंढरी संबोधले जाणारा तालुका म्हणून ओळख असल्यामुळे या वर्षी आतिपावसाने द्राक्ष पिकाचे व कांदा भात पिकाला फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करीत आहे .भातोडा , मुळाणे , बाबापूर , चंडीकापूर चामदरी, गोलदरी परिसरात काढणीस आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे .
द्राक्ष पिकाची गोडा बार छाटणी झाल्यापासून पहिल्या दिवसापासुन पंचेचाळीस दिवसापर्यंत द्राक्ष पिकाचे पावसापासुन संरक्षण करण्यासाठी बळीराजा रात्रीचा दिवस करु न आपले द्राक्ष पिक वाचवत असतो परंतू या वर्षी सप्टेबर महिन्यात गोडा बार छाटणी पासूनच पाऊस सुरू असल्यामुळे द्राक्षांच्या टोपण , व घडपास होणे किंवा फुलाºयात असलेल्या पिकाला रात्री पाऊस झाला तरी त्वरित औषधाची धुरडणी किंवा फवारणी करावी लागत असते या वर्षी अति पावसामुळे द्राक्ष पिकावर करपा ,डावण्या , घिडजरणे , असे मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे द्राक्ष पिकाचा व कांदा पिकाचा पंचनामा करण्याची मागणी अंबानेरचे शांताराम घुले यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Hit the onion with the rainy vine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.