गोपाल पावरा (३०) रा. आंबा फाटा, पोस्ट तहाडकसबे, ता. शिरपूर, जि. धुळे याने फिर्याद दिली. गेल्या शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रक एमएच ०४ जीआर २२३२ भरधाव वेगात चालवून पुढे चालणारी दुचाकी क्रमांक एमएच १८ बीटी १३४२ ला मागून धडक दिली. यात दुचाकी चालक रवींद्र गोपाल पावरा जखमी झाले, तर त्यांच्या पाठीमागे बसलेला अजय प्यारेलाल पवार (२७) रा. मुबारकपुरा, ता. शहादा, जि. नंदूरबार याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो ठार झाला. अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार खैरनार करीत आहेत.
दुचाकीला धडक; एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:22 IST