आदिवासी तांड्याने घडवला इतिहास
By Admin | Updated: October 17, 2014 00:10 IST2014-10-16T22:20:01+5:302014-10-17T00:10:03+5:30
आदिवासी तांड्याने घडवला इतिहास

आदिवासी तांड्याने घडवला इतिहास
येवला : देवळाने येथून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आदिवासी तांड्याने घडवला यंदाच्या निवडणुकीत इतिहास घडवला. तांड्यावर अनेक उमेदवार प्रचारासाठी गेले होते. प्रलोभन दाखवली गेली. पण शे -दोनशे रुपये आपल्या आयुष्याला पुरणार आहे का? असा सवाल येथील तरुणांनी बैठकीत व्यक्त केला. सर्वांनी अनुमोदन दिले असे नाही तर सर्व प्रलोभने ठोकरत एकित्रत मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले.
येथील सरपंच हिराबाई मोरे, सदस्य चांगदेव मोरे, ज्ञानेश्वर मोरे, देवबा मोरे, गोरख मोरे, दिलीप मोरे, मच्छिंद्र मोरे यांच्यासह १२५ आदिवासी बांधवांनी यानिमित्त आदर्श पायंडा पाडून आदर्श निर्माण केला आहे. मतदानाच्या दिवशी हक्क न बजावता सहलीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या पांढरपेशा वर्गाला चपराक या आदिवासी बांधवांनी दिली आहे.
या मतदारांनी मतदानावेळी ‘आम्ही वाजत गाजत आलो’, ‘आम्हाला वाहन नको’, ‘पैसा अडका नको’, ‘आमच्या पायाने आलो’, आम्ही मतदान केले, आमच्या तांड्यावर घरकुल हवे, आम्हाला विकास पाहिजे, असे ठासून सांगत या १२५ आदिवासी पुरुष व महिलांनी एकत्रित मतदान केले.
विकास किती महत्त्वाचा असतो ही भूमिका पटवून देण्यासाठी राधाकिसन सोनवणे, पं. स. माजी सभापती रामदास काळे, बाळासाहेब काळे यांनी मार्गदर्शन लाभले.