भविष्यासाठी इतिहासाकडे पाठ फि रवता येणार नाही
By Admin | Updated: February 15, 2017 00:30 IST2017-02-15T00:30:42+5:302017-02-15T00:30:56+5:30
मृणाल कुलकर्णी : राज्यस्तरीय वाणी गुणगौरव सोहळा

भविष्यासाठी इतिहासाकडे पाठ फि रवता येणार नाही
नाशिक : इतिहासाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षातून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वांनाच प्रेरणा मिळते. त्यामुळे केवळ भविष्यातील सोयिस्कर आणि सोप्या जीवनशैलीसाठी एकाकी मार्गावर चालताना इतिहासाकडे पाठ फरविता येणार नाही, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री मृणाल कु लकर्णी यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे स्वामी विवेकानंद शैक्षणिक सेवाभावी संस्था व महाराष्ट्र वाणी युवा मंच यांच्या संयुक्त राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोपाळराव केले यांच्यासह व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाचपुते, उपाध्यक्ष धनंजय नेवाडकर, राष्ट्रीय वाणी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेश कोठावदे, सुनील नेरकर, भूषण महाले आदि उपस्थित होते. याप्रसंगी कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येक कु टुंबातील लहान मुलांना थोर महापुरुषांच्या इतिहासासोबतच आपल्या कुटुंबाचाही इतिहास माहीत असणे गरजेचे आहे. त्यातून मुलांना भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी निश्चित बळ मिळते. परंतु आजच्या शैक्षणिक पद्धतीत आणि जीवनशैलीत इतिहासाकडे पाठ फिरवून पुढे जाण्याची प्रवृत्ती वाढली असल्याने मुलांमधील घटत्या संघर्षशक्तीविषयी चिंता व्यक्त करतानाच आजच्या पिढीसमोर केवळ इतिहासाचा पेपर लिहिण्यापुरता इतिहास मर्यादित होत असल्याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी कुलकर्णी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, राजेंद्र पाचपुते यांनी प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यामागील संस्थेची भूमिका स्पष्ट केली.(प्रतिनिधी)