शहरात हिंदू एकता दिंडी आठवले जन्मोत्सव : विविध संस्थांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:53 IST2018-05-27T00:53:47+5:302018-05-27T00:53:47+5:30
नाशिक : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र-स्थापनेचे प्रेरणास्त्रोत डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे २०१८ या दिवशी ७६ वर्षे पूर्ण झाली.

शहरात हिंदू एकता दिंडी आठवले जन्मोत्सव : विविध संस्थांचा सहभाग
नाशिक : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र-स्थापनेचे प्रेरणास्त्रोत डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे २०१८ या दिवशी ७६ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदू राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शनिवारी (दि. २६) सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन अनिकेतानंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन सनातन संस्थेचे महेंद्र क्षत्रिय यांच्या हस्ते झाले. सायंकाळी साक्षी गणेश मंदिरापासून या दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, रणरागिणी पथक, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक, चित्ररथ, राष्ट्रपुरु षांच्या वेशभूषेतील बालपथक सहभागी झाले होते. गाडगेमहाराज चौक, धुमाळ चौक, रविवार कारंजा, एकमुखी दत्त मंदिर येथे दिंडीची सांगता झाली. यावेळी श्रीमती वैशाली कातकडे व प्रशांत कुलकर्णी यांनी उपस्थिताना संबोधित केले. दिंडीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक मंडळे, संप्रदाय सहभागी झाल्या होते. यावेळी सनातन संस्थेचे महेंद्र क्षत्रिय, धोंगडे महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, बजरंग दलाचे नाशिक जिल्हा संयोजक विनोद थोरात, हिंदू जनजागृती समितीचे शशिधर जोशी, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित आदी उपस्थित होते.