हिंदू धर्म महासंमेलनास प्रारंभ
By Admin | Updated: April 2, 2017 22:25 IST2017-04-02T22:25:16+5:302017-04-02T22:25:16+5:30
रविवारी सायंकाळी दुर्गा माता पूजन व घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

हिंदू धर्म महासंमेलनास प्रारंभ
पंचवटी : तपोवन येथील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रनिमित्ताने श्रीश्री महाशक्ती बासंती दुर्गा पूजा व हिंदू धर्म महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी सायंकाळी दुर्गा माता पूजन व घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
या बासंती दुर्गा पूजा निमित्ताने रविवारी सायंकाळी महासष्ठी पूजा, आमंत्रण व अधिवास कार्यक्र म झाला. त्यानंतर दुर्गा मातेची आरती व पूजन करण्यात आले. येत्या गुरु वारपर्यंत हा उत्सव सुरू राहणार असून, यात दैनंदिन कार्यक्र मात महासप्तमी पूजन, पुष्पांजली, महाप्रसाद, महाअष्टमी पूजन, महानवमी पूजन, संधी पूजा आदिंसह विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न होणार आहेत.
गुरु वारी दुपारी पूजा, पुष्पांजली, आरती, सिंदूर उत्सव व त्यानंतर विजयादशमीनिमित्ताने रामकुंडात देवीमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. भारत सेवाश्रम संघाचे प्रभारी स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले आहे.
सायंकाळी झालेल्या या दुर्गा पूजा व हिंदू महासंमेलनाला श्रीमद स्वामी ध्यानेश्वरानंद, स्वामी अंबिकानंद, स्वामी श्यामनंद, स्वामी जिवेश्वरानंद, स्वामी विश्वरूपानंद, स्वामी शांतीमयानंद, स्वामी बोधमित्रानंद, स्वामी स्वागतनंद, स्वामी ब्रतानंद, स्वामी आत्मभोलानंद आदिंसह साधूमहंत, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.