नाशिक : इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस्टर्न फूडचीही मागणी केली गेल्याची चर्चा होत आहे. इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचा फौजफाटा घेत छापा टाकला. यावेळी अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये येथे बारा तरुणी, दहा तरुण अंमलीपदार्थांची नशा करताना आढळून आले. न्यायालयाने सुरुवातील पांचालला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती; मात्र मंगळवारी पुन्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता पांचालकडून करण्यात आलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत पोलीस काेठडी ५ जुलैपर्यंत वाढविली. यामुळे पांचालचा कोठडीतील मुक्काम वाढला. जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिनाची चौकशी सुरू केली तेव्हा पोलीस ठाण्यात तिने चंदेरी दुनियेत याचे फारसे अप्रूप वाटत नाही, अशाप्रकारची मौजमजा ही अगदी सामान्य बाब (नॉर्मल) असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. दरम्यान, एका अधिकाऱ्याने हे नाशिकमध्ये चालणार नाही, हे लक्षात घ्या, असेही तिला बजावून सांगितल्याची चर्चा आहे.पोलीस कोठडीत असलेल्या १२ महिलांसह अन्य सर्व पुरुषांच्या मुक्कामाची ‘तजवीज’ शहरातील वाडीवऱ्हे, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदी भागातील पोलीस ठाण्यांमधील लॉकअपमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, वरीलपैकी एका लॉकअपमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत असलेल्या हिनाकडून भोजनासाठी सेलिब्रिटी लाइफस्टाइलनुसार पश्चिमात्य खाद्यपदार्थ मिळण्याची विनंतीवजा मागणी पुढे आल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तिची ही मागणी मात्र फेटाळून लावत ‘जे सर्वांना भोजन दिले जाते, तेच तुम्हालाही मिळेल’, असे ठणकावून सांगितले.
हिना पांचालला नकोय लॉकअपचे भोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 00:59 IST
इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस्टर्न फूडचीही मागणी केली गेल्याची चर्चा होत आहे.
हिना पांचालला नकोय लॉकअपचे भोजन!
ठळक मुद्दे ‘वेस्टर्न फूड’ची मागणी केल्याची रंगतेय चर्चा