शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

दरवाढीचा भडका कायम : नाशिककर करताहेत पेट्रोलची बचत

By अझहर शेख | Updated: September 17, 2018 22:23 IST

शहरातील पेट्रोलपंपांवर गरजेपुरतेच पेट्रोल वाहनांच्या टाकीत भरताना नागरिक दिसून येत आहेत. दररोज लागेल तेवढेच पेट्रोल भरायचे, असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. तसेच गरजेच्या वेळीच वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्नही नागरिक करत आहे. एकू णच पेट्रोलची बचत कशी होईल, यादृष्टीने नागरिक प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देपेट्रोलपंपांवर ८९.८९ किंवा ८९.९० रुपये असा दर सोमवारी आकारण्यात आला. पेट्रोल दरात तफावतकाटेकोरपणे पेट्रोलची बचत करण्यावर भर इंधनदरवाढीविरोधात एल्गार पुकारल्यानंतरही दरवाढीवर सरकारकडून नियंत्रण नाही.

नाशिक : ‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोलदरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नलवर बहुतांश दुचाकीस्वारांसह चारचाकीचालकदेखील आता ‘ग्रीन’ सिग्नल मिळेपर्यंत वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील पेट्रोलपंपांवर गरजेपुरतेच पेट्रोल वाहनांच्या टाकीत भरताना नागरिक दिसून येत आहेत. दररोज लागेल तेवढेच पेट्रोल भरायचे, असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. तसेच गरजेच्या वेळीच वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्नही नागरिक करत आहे. एकू णच पेट्रोलची बचत कशी होईल, यादृष्टीने नागरिक प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. कारण विरोधी पक्षांनी एकत्र येत देशभर इंधनदरवाढीविरोधात एल्गार पुकारल्यानंतरही दरवाढीवर सरकारकडून कुठल्याही प्रकारे नियंत्रण आणण्यात आलेले नाही. याउलट देशभर मोर्चाची लाट उसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेट्रोल दर शंभरीला भिडले. त्यामुळे सत्ताधारी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जातील, अशी भोळीभाबडी आशादेखील संपुष्टात आली असून दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा तसेच जीवनावश्यक घटक असलेल्या पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी होतील यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

दरवाढीमुळे नागरिकांनी आता बचतीवर लक्ष केंद्रित केले आहे. जितका शक्य होईल तितका वाहनाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करताना नाशिककर दिसत आहे. तसेच रस्त्यावरून प्रवास करताना शहरातील विविध सिग्नलवर वाहनचालकांकडून वाहनांचे इंजिन स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेषत: महिला वाहनचालक याबाबत अधिक खबरदारी घेत असून त्यांच्याकडे स्वयंपाकघरातील गणित जुळविण्याचा अनुभव असल्याने महिला वाहनचालक अत्यंत काटेकोरपणे पेट्रोलची बचत करण्यावर भर देत आहेत. सिग्नलवर थांबताना आपल्या वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.पेट्रोल दरात तफावतदराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण संकेतस्थळासह पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनकडून जाहीर होणारे दैनंदिन पेट्रोल-डिझेलचे दर आणि प्रत्यक्षात शहरातील विविध पेट्रोलपंपांवर केली जाणा-या दर आकारणीमध्ये तफावत आढळून येत आहे. ८९.८७ रुपये असा दर सोमवारी जाहीर केला असला तरी बहुतांश पेट्रोलपंपांवर ८९.८९ किंवा ८९.९० रुपये असा आकारण्यात आला. त्यामुळे पेट्रोलपंपांवर वाद-विवादाचे प्रसंगही घडले.

संध्याकाळी पेट्रोलपंपांवर शुकशुकाटपेट्रोलच्या दरवाढीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. परिणामी संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेतही शहरातील त्र्यंबक नाका, गंगापूररोड, पंचवटी, निमाणी, नाशिकरोड, सातपूर-त्र्यंबक रस्ता आदी ठिकाणांच्या पेट्रोलपंपांवर शुकशुकाट बघावयास मिळाला. संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान बहुतांश पंपांवर पेट्रोल डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचा-यांना वाहनांची प्रतीक्षा करावी लागत होती.

काही पंपांवर दरफलकांचा अभावशहरातील काही पेट्रोलपंपांवर ‘आजचे दरफलक’ झळकल्याचे पहावयास मिळाले तर काही पेट्रोलपंपचालकांनी दरफलक लावण्याकडे काणाडोळा करणे पसंत केल्याचेही दिसून आले. पेट्रोलपंपांवर दरफलक लावणे बंधनकारक असूनदेखील दर्शनी भागावर दरफलक लावले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी दरफलक आढळले नाही तेथे काही जागरूक नागरिकांनी दर विचारल्यास संबंधित कर्मचाºयांकडून ‘मीटर बघा’ असा सल्लाही दिला गेला.असे आहेत शहरातील साप्ताहिक दरदिनांक     पेट्रोल      डिझेल       पॉवर पेट्रोल       टर्बो डिझेल--------------------------------------------------------------------११ सप्टें.   ८८.७२      ७६.७२             ९१.५४              ७९.८११२ सप्टें. ८८.७२        ७६.७२            ९१.५४              ७९.९६१३ सप्टें. ८८.८५         ७६.८४           ९१.६७              ८०.०५१४ सप्टें. ८९.१२           ७७.०७           ९१.९४            ७९.०७१५ सप्टें. ८९.४७           ७७.३२           ९२.२९            ७७.५७ १६ सप्टें. ८९.७४           ७७.५०           ९२.५६            ७७.६८      १७ सप्टें. ८९.८९          ७७.५६           ९२.७१            ७७.६८

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढNashikनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा