शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग उड्डाणपूल : बोगद्यासाठी अजून किती बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:44 IST

राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले

ठळक मुद्देमहामार्ग रोखण्याचा पवित्रा संतप्त झालेल्या महिलांनी घेतला होता. तीन वर्षांपासून बोगद्याचे काम का रखडले?

नाशिक : मागील तीन वर्षांपासून कमोदनगरजवळ उड्डाणपूलाला बोगदा करण्याची मागणी केली जात असताना याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील क्र ॉसिंग पॉइंट ओलांडताना आतापर्यंत २५हून अधिक लोकांचा बळी गेला. महामार्ग प्राधिकरणाला बोगदा तयार करण्यासाठी अजून किती बळी हवेत? असा संतप्त सवाल उपस्थित करत खासदार हेमंत गोडसे यांना जाब विचारला. गुरूवारी (दि.३०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे दोनशेहून अधिक महिलांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत प्राधिकरणाचा निषेध नोंदविला.राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले असताना गुरूवारी कमोदनगरचे रहिवाशी रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी करावी आणि बोगद्याच्या कामाचा नारळ वाढवावा, अन्यथा महामार्ग रोखण्याचा पवित्रा संतप्त झालेल्या महिलांनी घेतला होता. प्रशासनाच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी घोषणाबाजी सुरू केली. याबाबत गोडसे यांच्याशी संपर्क साधण्यात आला; काही मिनिटांतच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमलेल्या महिलांनी त्यांना घेराव घालत तीन वर्षांपासून बोगद्याचे काम का रखडले? या मुख्य प्रश्नासह विविध मागण्यांचा भडीमार केला.

यावेळी गोडसे यांनी संतप्त रहिवाशांची समजूत काढत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांशी तत्काळ संपर्क साधला. रहिवाशांसमक्ष त्यांनी संवाद साधत अधिका-यांना शुक्रवारी पाचारण करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, संतप्त महिलांनी त्यांना होणारा त्रास कथन करताना विविध समस्यांचा पाढा वाचला. बोगद्याच्या कामाबाबत शुक्रवारी हालचाल न झाल्यास महामार्ग रोखून धरणार असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदविला.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिकAccidentअपघात