महामार्गावरील दिशादर्शक,सूचना फलकाची दुरवस्था

By Admin | Updated: September 24, 2016 01:22 IST2016-09-24T01:19:04+5:302016-09-24T01:22:59+5:30

दुर्लक्ष : वाहनचालकांमध्ये गोंधळ

Highway Directions, Information Falcahood | महामार्गावरील दिशादर्शक,सूचना फलकाची दुरवस्था

महामार्गावरील दिशादर्शक,सूचना फलकाची दुरवस्था

खामखेडा : नाशिक - कळवण -बेज-खामखेडा-सटाणा-नामपूर-साक्री हा राज्य महामार्ग क्रमंक १७ असून, या प्रमुख मार्गावरील दिशादर्शक व गावाचे अंतर दाखविणाऱ्या फलकाची अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरील कोणते गाव किती अंतरावर आहे आणि कोणते गाव कोणत्या दिशेला आहे हे कळत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ होऊन रस्ता चुकतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग काही करीत नसल्याचे दिसून येत आहे.
या मार्गावरील दिशादर्शक व अंतरदर्शक फलक ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे व गवत यांच्यात झाकले गेल्याने तसेच अनेक फलकांवर जाहिराती चिटकवल्या असल्याने फलकावरील सूचना किंवा पुढे काय आहे हे समजत नाही.
वाहनचालकांना रस्त्याची दिशा, अंतर व कोणते गाव आहे हे कळत नाही. त्यामुळे वाहनचालक रस्ता चुकतात. तेव्हा रस्त्याच्या कडेची झाडेझुडपे काढण्यात यावी व सूचना फलक नव्याने लावण्यात यावेत, अशी मागणी नगरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Highway Directions, Information Falcahood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.