पंचवटीला सर्वाधिक सत्तापदांचे झुकते माप

By Admin | Updated: January 20, 2017 23:46 IST2017-01-20T23:45:55+5:302017-01-20T23:46:11+5:30

चार महापौर, पाच सभापती : तरीही विकासाची तहान कायम

The highest level of bent weight of Panchavati | पंचवटीला सर्वाधिक सत्तापदांचे झुकते माप

पंचवटीला सर्वाधिक सत्तापदांचे झुकते माप

संदीप झिरवाळ : पंचवटी
कधी शिवसेना, तर कधी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी विभागात आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाने आपली राजकीय पकड मजबूत ठेवलेली नाही दरवेळेसच ‘नवा गडी नवे राज्य’ अशीच काहीशी महती पंचवटीच्या बाबतीत ठरली आहे. पंचवटीला सर्वाधिक सत्तापदांचे झुकते माप मिळूनही पंचवटी तहानलेली तर आहेच शिवाय विकासाची तहान अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.  कधी अपक्ष, तर कधी कॉँग्रेस आणि नंतर भाजपा व सध्या मनसे पक्षाचा महापौर मिळालाच, शिवाय भाजपाला व अपक्ष सदस्यांना एकदा उपमहापौराची संधीही मिळाली. कॉँगे्रस, अपक्ष, शिवसेना, मनसे, या पक्षांचे नगरसेवक स्थायी समितीचे सभापती झाले खरे, परंतु विकास पाहिजे तसा झाला नाहीच अन्् मोठ्या प्रकल्पांची निर्मितीही झाली नाही. दरवेळेस महापालिका निवडणुकीत वचननामे काढले त्याप्रमाणे आश्वासनांची पूर्ती झालीच नसल्याचे मतदार बोलून दाखवित आहे. तब्बल १२ वेळा पालिकेतील महत्त्वाचे पद उपभोगण्याची संधी मिळाल्यानंतरही विभागाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही, असे म्हटले तर वावगे ठरू नये.  पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, घरकुल योजना, पंडित पलुस्कर सभागृह, महापालिकेचे विभागीय क्रीडा संकुल, स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव, सावरकर स्मारक यांसारखे प्रकल्प उभे राहिले. क्रीडा संकुलाचा ताबा विभागीय क्रीडा समितीने घेतला आहे. आडगाव नाक्यावर उभारलेले सावरकर स्मारकाचे रेंगाळलेले काम व नंतर लोकार्पण वर्चस्व व श्रेयवादाचा विषय ठरला. गोदावरी नदीपात्रात बसविलेला फिल्टरेशन प्लांटही कालांतराने दिसेनासा झाला. इंदिरा गांधी रुग्णालयातही अद्ययावत तपासणी यंत्र, सोनोग्राफी यंत्र यांची वानवा असल्याने महिलांची गैरसोय निर्माण होते.

Web Title: The highest level of bent weight of Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.