बीबीएफ पद्धतीमुळे कमी बियाणात सोयाबीनचे जास्त उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:38+5:302021-06-23T04:10:38+5:30
सिन्नर : उत्पादन खर्चातील वाढीमुळे शेतीतील उत्पन्न घटले आहे. ही बाब खरी असली तरी पीक पद्धतीत बदलांचा अंतर्भाव आवश्यक ...

बीबीएफ पद्धतीमुळे कमी बियाणात सोयाबीनचे जास्त उत्पादन
सिन्नर : उत्पादन खर्चातील वाढीमुळे शेतीतील उत्पन्न घटले आहे. ही बाब खरी असली तरी पीक पद्धतीत बदलांचा अंतर्भाव आवश्यक आहे. राज्यात कापसानंतर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. ‘बीबीएफ’ (रुंद सरी वरंबा) पद्धतीमुळे सोयाबीनचे कमी बियाणात जास्त उत्पादन मिळेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथे सोमवारी (दि. २१) राज्यस्तरीय कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, युवा नेते उदय सांगळे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, सरपंच मंदाकिनी काळे आदी उपस्थित होते. यंदा सोयाबीनला आठ हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे दर मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काळात सोयाबीन लागवड कापसाला मागे टाकण्याची शक्यता असल्याचे भुसे यांनी नमूद केले. दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. त्यावर बोलताना भुसे यांनी जमिनीची आरोग्यपत्रिका तपासून खतांचा वापर केल्यास उत्पादन क्षमता प्रतिहेक्टरी ४० क्विंटलपर्यंत होऊ शकते, असे सांगितले.
----------------------
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार
शेती उत्पादनात नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे, अधिक उत्पादन मिळालेले तसेच पुरस्कारप्राप्त शेतकरी बाळासाहेब मराळे, भागवत बलक, कारभारी सांगळे, सुनील भिसे, बाळासाहेब केदार, रामहरी सुरसे, संपत वाणी, श्रीराम शिरोळे, अलका बोडके, नारायण देशमुख, विठाबाई बलक आदींचा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
------------------
वडगाव-सिन्नर येथे राज्यस्तरीय कृषी संजीवनी योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. व्यासपीठावर बाळासाहेब क्षीरसागर, राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, लीला बनसोड, कोंडाजी आव्हाड यांच्यासह मान्यवर. (२१ सिन्नर ३)
===Photopath===
210621\542321nsk_54_21062021_13.jpg
===Caption===
२१ सिन्नर ३