उच्चदाब विद्युतवाहिनी मुख्य रस्त्यावर कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:12 IST2021-06-25T04:12:08+5:302021-06-25T04:12:08+5:30
सिडको परिसरातील डीजीपीनगर, खुटवडनगर ते आयटीआय पुलाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विठ्ठलनगर येथे एकलहरा येथून सातपूर येथे जाणाऱ्या विजेच्या मनोऱ्यामधून ...

उच्चदाब विद्युतवाहिनी मुख्य रस्त्यावर कोसळली
सिडको परिसरातील डीजीपीनगर, खुटवडनगर ते आयटीआय पुलाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विठ्ठलनगर येथे एकलहरा येथून सातपूर येथे जाणाऱ्या विजेच्या मनोऱ्यामधून १३२ केव्हीची क्षमता असलेली वीजवाहिनी अचानक तुटून थेट रस्त्यावर येऊन पडली. याबाबतची माहिती भाजपचे प्रदीप पेशकार व अशोक पवार यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करून तात्काळ विद्युत विभागाला माहिती देऊन विद्युत पुरवठा बंद केला. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, याबाबतची माहिती महापारेषणला दिली. महापारेषणचे कार्यकारी अभियंता नवलाखे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.जी. पाटील आदींनी कर्मचाऱ्यांसह दाखल होऊन कामास सुरुवात केली. सुमारे चार ते पाच तास तार जोडण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ जरी टळला असला तरी या भागातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
(फोटो २४ वीज)