प्रभाग सभापतिपदासाठी महाआघाडीत रस्सीखेच

By Admin | Updated: April 7, 2016 00:21 IST2016-04-06T23:16:31+5:302016-04-07T00:21:29+5:30

महापालिका : आज उमेदवारी अर्ज स्वीकृती

High-speed racket for the post of presidential candidate | प्रभाग सभापतिपदासाठी महाआघाडीत रस्सीखेच

प्रभाग सभापतिपदासाठी महाआघाडीत रस्सीखेच

 नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी महाआघाडीतच रस्सीखेच असून, सहापैकी चार समित्या महाआघाडीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.७) सकाळी ११ ते १ या वेळेत सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती नगरसचिव दिलीप जुन्नरे यांनी दिली. मनपाच्या प्रभाग समिती सभापतिपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.
दि. १२ एप्रिल रोजी सातपूर, सिडको आणि नाशिकरोड विभागाच्या तर दि. १३ एप्रिल रोजी पश्चिम, पंचवटी आणि पूर्व प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.७) सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, आतापर्यंत नाशिक पूर्वमधून अपक्ष शेख रशिदा, कॉँग्रेसच्या समीना मेमन, राष्ट्रवादीचे सुफीयान जीन आणि नीलिमा आमले, पश्चिममधून मनसेच्या बंडखोर माधुरी जाधव, पंचवटीतून मनसेचे रुची कुंभारकर, अपक्ष दामोदर मानकर आणि भाजपाचे परशराम वाघेरे, नाशिकरोडमधून रिपाइंचे सुनील वाघ, सिडकोतून कॉँग्रेसच्या अश्विनी बोरस्ते आणि सातपूरमधून उषा अहिरे व मनसेच्या सविता काळे यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

Web Title: High-speed racket for the post of presidential candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.