दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:44+5:302021-04-22T04:14:44+5:30

नाशिक : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे ...

High level inquiry into the accident - Ajit Pawar | दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी - अजित पवार

दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी - अजित पवार

नाशिक : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यातील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना, अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशाप्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये, याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Web Title: High level inquiry into the accident - Ajit Pawar