उच्च अतिथी समितीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:46+5:302021-02-12T04:14:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनातील उच्च अतिथीसाठी असलेल्या समितीची बैठक गुरुवारी समितीचे अध्यक्ष ...

Of the High Guest Committee | उच्च अतिथी समितीच्या

उच्च अतिथी समितीच्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनातील उच्च अतिथीसाठी असलेल्या समितीची बैठक गुरुवारी समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यात अतिमहत्वाच्या व्यक्तींची आसन व्यवस्था,सुरक्षा ,खर्चाचे अंदाजपत्रक ,समित्यांचे नियोजन,कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.

यावेळी संमेलनाचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर तसेच लोकहितवादी मंडळाचे कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्याशिवाय बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली . स्वयंसेवकांची आवश्यकता, त्यांना सूचना नियोजन, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करण्याविषयी विचारविनिमय, समिती सदस्य व्हॉटसॲप ग्रुपवरुन माहितीची देवाणघेवाण तसेच पुढील रूपरेषा ठरविण्यात आली. समितीचे उपाध्यक्ष मंगेश पंचाक्षरी आणि डॉ. रविराज खैरनार हे देखील यावेळी उपस्थित होते.

इन्फो

नाशिकच्या आदरातिथ्याचे दर्शन

नाशिककरांसाठी घरचे कार्य असल्याने या प्रतिष्ठित साहित्य संमेलनात अत्युच्च अतिथींना नाशिकच्या उत्तम आदरातिथ्याचा अनुभव या दृष्टीनेच नियोजन करण्याचा तसेच तशीच अंमलबजावणी करण्याचा निर्धार समिती सदस्यांनी केला. या बैठकीस नानासाहेब सोनवणे,मिलिंद धटींगण, पद्माकर मोराडे, अश्विनी कुलकर्णी, ऋता पंडित, संगीता फुके, डॉ.संध्या खेडेकर, डॉ. राजश्री पाटील, रमेश कडलग, प्रसाद गर्भे, चिन्मय खेडेकर हे सदस्य उपस्थित होते.

लोगो

साहित्य संमेलन लोगो वापरावा

Web Title: Of the High Guest Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.