दारणा नदीच्या काठावरील गावांना ‘हाय अ‍ॅलर्ट’

By Admin | Updated: July 2, 2017 13:50 IST2017-07-02T13:44:32+5:302017-07-02T13:50:41+5:30

इगतपूरी, निफाड, नाशिक तालुक्यातील दारणा नदीच्या काठावरील गावांनात जिल्हा प्रशासनाकडून हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

'High alert' to the villages on the banks of Darna | दारणा नदीच्या काठावरील गावांना ‘हाय अ‍ॅलर्ट’

दारणा नदीच्या काठावरील गावांना ‘हाय अ‍ॅलर्ट’

नाशिक : दारणा धरणामधून नदीपात्रात ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे इगतपूरी, निफाड, नाशिक तालुक्यातील दारणा नदीच्या काठावरील गावांनात जिल्हा प्रशासनाकडून हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाचा जोर इगतपूरी तालुक्यात असाच राहिल्यास विसर्ग अधिक वाढविला जाऊ शकतो. कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. मागील दोन ते चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे.

Web Title: 'High alert' to the villages on the banks of Darna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.