शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वीर पत्नी विजेता बनणार ‘फ्लाइंग आॅफिसर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:43 IST

पती शहीद झाल्याचे हिमालयाएवढे दु:ख काही क्षणांत बाजूला करीत त्यांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करणारी ती वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे तिने दाखवून दिले आहे.

नाशिक : पती शहीद झाल्याचे हिमालयाएवढे दु:ख काही क्षणांत बाजूला करीत त्यांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करणारी ती वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे तिने दाखवून दिले आहे. स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे काश्मीरमध्ये शहीद झाल्याचे दु:ख बाजूला सारत त्यांच्या पत्नी विजेता निनाद मांडवगणे यांनीदेखील ‘फ्लाइंग आॅफिसर’ बनण्याच्या दिशेने झेप घेतली आहे. त्यासाठी त्या नुकत्याच हैदराबादला रवाना झाल्या असून, वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या जुलै २०२० मध्ये भारतीय हवाईदलात अधिकारी म्हणून रुजू होतील.भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे पडघम वाजत असतानाच २७ फेब्रुवारीच्या काळरात्री निनाद मांडवगणे यांचे विमान बडगाम येथे कोसळले आणि संपूर्ण मांडवगणे कुटुंबीयांवर जणू आकाशच कोसळले. त्या दिवशी निनाद यांच्या पत्नी विजेता यांना बसलेला धक्का हा शब्दातीत होता. मात्र, आपणच कोसळलो तर आपली दोन वर्षांची चिमुरडी आणि निनादचे आई-वडील यांना कोण सांभाळेल, असा विचार करीत विजेता यांनी त्या धक्क्यातून सावरण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी मार्चमध्येच ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा दिली. त्यानंतर मार्चअखेरीस परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला.पात्रतेसाठीचा संघर्षविजेता या लेखीपरीक्षेत उत्तीर्ण झाल्या असल्या तरी वैद्यकीय चाचणी आणि तंदुरुस्तीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. दोन वर्षांच्या बालिकेची आई आणि गृहिणी असलेल्या विजेता यांना सैन्यदलाच्या क्षमतेची तंदुरुस्ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मात्र, त्यातही न डगमगता त्यांनी दिवस-रात्र घाम गाळत शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचणीतही बाजी मारली. अखेरीस कागदपत्रांची सर्व पूर्तता झाल्यानंतर विजेता या जुलै महिन्यातच प्रशिक्षणासाठी हैदराबादला रवाना झाल्या आहेत.चिमुरडी वेदिता आजी-आजोबांकडेनिनाद आणि विजेता यांची चिमुरडी ‘वेदिता’ ही सध्या नाशिकला निनादचे आई-वडील श्रीमती सुषमा आणि अनिल मांडवगणे यांच्याच घरी राहत आहे. सतत आईजवळच बिलगून राहणाऱ्या वेदिताची आईदेखील प्रशिक्षणासाठी आता हैदराबादला गेल्यापासून सतत आई कुठे आहे? हाच ध्यास तिला लागला आहे. त्यामुळे मांडवगणे कुटुंबाला एकाच वेळी अनेक भावनिक आंदोलने झेलत त्या गोंडस बालिकेचे मन राखताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.परीक्षेवेळीच झाली होती भेटविजेता या मूळच्या लखनऊच्या विजेता तिवारी होत्या. निनाद आणि विजेता यांची भेट भोपाळलाच ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा देतानाच झाली होती. त्या परीक्षेत निनाद उत्तीर्ण, तर विजेता या अनुत्तीर्ण झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर सुमारे चार वर्षे एकमेकांशी समाज माध्यमांद्वारे संवाद झाल्यानंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मग दोन्ही कुटुंबांनी त्यांचे लग्न लावून दिले. तेव्हापासून विजेता या निनादबरोबरच त्यांच्या बदलीच्या ठिकाणी मिळणाºया हवाईदलाच्या क्वार्टर्समध्ये राहत होत्या.तेराव्याच्या दिवशीच परीक्षेलासैन्यदलाची परीक्षा ही दर सहा महिन्यांनी होत असते, याची माहिती विजेता यांना होती. सैन्यदलातीलच एका परिचिताकडून ही परीक्षा निनादच्या तेराव्याच्या दिवशीच म्हणजेच ११ मार्चला असल्याचे विजेता यांना समजले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आपण परीक्षेला बसणार असल्याचा निर्धार कळविला. त्यांच्यासाठी मग प्रवेशाचा अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि विजेता या ‘फ्लाइंग आॅफिसर’ पदाच्या परीक्षेसाठी गुजरातमधील गांधीनगरला पोहोचल्या. निनादच्या तेराव्याच्या दिवशी विजेता यांनी परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देत एकप्रकारे निनाद यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNashikनाशिक