‘हिरो’च्या सेवानिवृत्तीने कर्मचारी भारावले !
By Admin | Updated: July 25, 2016 23:51 IST2016-07-25T23:51:09+5:302016-07-25T23:51:40+5:30
‘हिरो’च्या सेवानिवृत्तीने कर्मचारी भारावले !

‘हिरो’च्या सेवानिवृत्तीने कर्मचारी भारावले !
मनमाड : बॉम्बशोधक श्वानाला रेल्वे पोलीस प्रशासनाचा निरोपगिरीश जोशी ल्ल मनमाड
अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड जंक्शनसह अन्य रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी गेली दहा वर्ष समर्थपणे सांभाळणाऱ्या मनमाड रेल्वे सुरक्षा बलातील बॉम्बशोधक श्वान हिरोचा सेवानिवृत्ती सोहळा रेल्वे कारखान्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आगळ्या-वेगळ्या निरोप समारंभाने कर्मचाऱ्यांसह अधिकारीसुद्धा भारावले.
उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी गाड्या जा-ये करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून हिरो या बॉम्बशोधक श्वानाची नियुक्ती करण्यात आली होती. नऊ वर्ष दहा महिने सेवा बजावल्यानंतर हा हिरो रेल्वे सुरक्षा बलाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाला. रेल्वे कारखान्यात या हिरोला निरोप समारंभाचे आयोजन करण्यात
आले होते. हार घालून मान्यवरांनी हिंरोचा सत्कार केला. यावेळी
यू.डी. शेळके, उपनिरीक्षक श्री सैनी, एससी-एसटी युनियनचे सतीश केदारे, पापा थॉमस, प्रकाश बोधक उपस्थित होते. (वार्ताहर)