औदाणे : हरणबारी येथे शेतीमध्ये लोखंडी नांगराच्या दांड्याचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२) या तरु णाचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत गुरुवारी वीज वितरण कंपनीने २० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश कुटुंबीयांना दिला.दिनेश चौरे याचे वडील काळू चौरे यांना वीस हजार रुपयांचा धनादेश वीज कंपनीचे महेश आहेर, निंबा सूर्यवंशी यांनी दिला. पुढील प्रस्ताव शासनाकडे पाठवून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
विजेच्या धक्क्याने मृत तरुणाच्या वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:25 IST