सरसावले मदतीचे हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:36 AM2019-08-06T01:36:05+5:302019-08-06T01:36:37+5:30

कुठे फूड पॅकेटचे वाटप, कुठे खिचडीचे वाटप तर कुठे निवासव्यवस्था करीत चहा आणि जेवण देण्याचे कार्य लोकप्रतिनिधी आणि समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले. विशेषत्वे करून गोदाकाठावरील झोपड्या आणि मातीच्या घरांमध्ये राहणाऱ्या आणि पुरात बहुतांश संसारोपयोगी साहित्य वाहून गेलेल्यांच्या मदतीसाठी हात पुढे येऊ लागल्याचे चित्र रविवार रात्रीपासूनच दिसून आले.

 A helping hand! | सरसावले मदतीचे हात!

सरसावले मदतीचे हात!

Next

नाशिक : कुठे फूड पॅकेटचे वाटप, कुठे खिचडीचे वाटप तर कुठे निवासव्यवस्था करीत चहा आणि जेवण देण्याचे कार्य लोकप्रतिनिधी आणि समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले. विशेषत्वे करून गोदाकाठावरील झोपड्या आणि मातीच्या घरांमध्ये राहणाऱ्या आणि पुरात बहुतांश संसारोपयोगी साहित्य वाहून गेलेल्यांच्या मदतीसाठी हात पुढे येऊ लागल्याचे चित्र रविवार रात्रीपासूनच दिसून आले.
रविवारी गोदावरीला आलेल्या महापुराने गोदापात्रालगत दोन्ही काठांवर राहणाºया गोरगरिबांचे संसारदेखील वाहून गेले. त्यामुळे लेकरा-बाळांसह उघड्यावर पडलेल्या अशा नागरिकांना काही लोकप्रतिनिधींनी आणि मनपा प्रशासनाकडून नजीकच्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात गाडगे महाराज धर्मशाळेतर्फे व्यवस्था केलेल्या मातंगवाडा आणि झरेकरी कोटवरील पूरग्रस्तांसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली. मखमलाबाद नाक्यावरील शाळेत पंचवटीकडील शंभरहून अधिक पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. त्यांना माजी महापौर अशोक मुर्तडक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी सायंकाळपासूनच चहा आणि जेवणाची व्यवस्था करून मदत करण्यात आली.
आमदार देवयानी फरांदे यांनी टाकळीच्या गवळीवाडा, जोशीवाडा तसेच भारतनगर, शिवाजीवाडी या भागांसह नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच आमदारांनी ताबडतोब स्वच्छतेचे आदेश देतानाच त्वरित पंचनामे करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
गोदावरीनगर, घारपुरे घाट, निमाणी शाळा येथील पूरग्रस्तांची मनपा प्रशासन आणि नगरसेवक अजय बोरस्ते यांनी रुंग्टा हायस्कूलमध्ये तर मंगलवाडी, जोशीवाड्यातील पूरग्रस्तांची सोय चोपडा लॉन्सच्या मागील भागात करून त्यांना रविवार सायंकाळपासून जेवण,नाश्ता, चहा देऊन धीर देण्यात आला. पंचवटीतील सेवाकुंजचे राजूभाऊ पोद्दार यांनी निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा भागातील पूरग्रस्तांना ५०० फूड पॅकेटचे वाटप केले. आनंदवली भागात मनपा प्रशासन आणि नगरसेवक संतोष गायकवाड यांनी बजरंगनगर, रोकडे मळा येथील नुकसानग्रस्तांची आनंदवलीच्या मनपा शाळा क्र. १८ मध्ये निवास व्यवस्था करून दिली.
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे शंभर कार्यकर्त्यांचे पथकदेखील सोमवारपासून मदतीसाठी दाखल झाले असून, गोदालगतच्या भागातील आणि घरांमधील गाळ उपसण्याच्या कार्यात त्यांनी योगदान दिले. दोन्ही काठांवरील परिसरात मंगळवारीदेखील स्वच्छतेचे काम करण्यात येणार आहे.
४ हजार फूड पॅकेटचे वाटप
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी सकाळपासूनच पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करीत गरजूंना तातडीची मदत म्हणून सुमारे ४ हजारांहून अधिक फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.

Web Title:  A helping hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.