शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

‘त्या’ चिमुकल्यांच्या वारसदारांना वनविभागाकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:57 IST

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.

ठळक मुद्देदहा वर्षांची असते मुदत ठेवमनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

नाशिक : पंधरवड्यापुर्वी भगुरजवळील दोनवाडे गावात शिरोळे कुटुंबातील चिमुकला रूद्र तसेच त्याअगोदर दहा ते बारा दिवसांपुर्वी हिंगणवेढे येथील पगारे कुटुुंबाचा एकुलता एक कुणाल हा शाळकरी मुलगा बिबट हल्ल्याचे बळी ठरले. या दोन्ही कुटुंबियांना नाशिक पश्चिम वनविभागाकडून पहिल्या टप्प्यातील तत्काळ दिली जाणारी पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.भगूर गावाजवळील दोनवाडे येथे उसशेतीला लागून असलेल्या शिरोळे यांच्या घराच्या ओट्यावर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या रूद्रवर १ मे रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात रूद्रचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली गेली. हातावरील मोलमजुरी करणार शिरोळे कुटुंबियांना नाशिक पश्चिम वनविभागाने शासननियमानुसार आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रुद्रचे वडील राजेश शिरोळे यांना सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांनी पाच लाखांचा धनादेश प्रदान केला. यावेळी वनपाल मधुकर गोसावी उपस्थित होते. हिंगणवेढा येथील पगारे कु टुंबियांनाही पाच लाखांपैकी उर्वरित दोन लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना यापुर्वी उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश देण्यात आला होता. वन्यप्राणी हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना पहिल्या टप्प्यातील तत्काळ मदत म्हणून पाच लाखांचा धनादेश देण्याची तरतूद शासकिय नियमानुसार करण्यात आली आहे.

....अशी आहे अर्थसहाय्याची तरतूदवाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. यापैकी तीन किंवा पाच लाख रुपयांचा धनादेश तत्काळ वारसदारांना वनविभागाकडून सुपुर्द केला जातो. उर्वरित बारा किंवा दहा लाखांची रक्कम राष्टÑीयकृत बॅँकेत असलेल्या वारसदारांच्या खात्यावर दरमहा व्याज मिळेल या स्वरूपात ‘फिक्स डिपॉझिट’ (एफडी) स्वरूपात जमा केली जाते.दहा वर्षांची असते मुदत ठेवपाच लाख रूपयांची मुदत ठेव पाच वर्षांकरिता व उर्वरित पाच लाखांची मुदत ठेव १० वर्षांकरिता असते. दहा वर्षानंतर वारसदारांना पुर्ण रक्कम मिळते. त्यासाठी उपवनसंरक्षक यांचा नाहरकत दाखल त्यावेळी उपवनसंरक्षक हे मुदतीपुर्व वारसदारांना अत्यावश्यक गरज भासल्यास त्याची खात्री करून रक्कम काढण्याची मुभा देऊ शकतात. त्यावेळी त्यांचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. २०१८ साली यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या वाघिणीच्या हल्ल्याच्या घटनेनंतर अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करण्यात आली. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याDeathमृत्यू