शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत
By Admin | Updated: September 21, 2015 22:33 IST2015-09-21T22:33:04+5:302015-09-21T22:33:31+5:30
मालेगाव : एकता गणेश मंडळाचा उपक्रम

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत
मालेगाव कॅम्प : सटाणा नाका येथील एकता मंडळातर्फे यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत तालुक्यातील आत्महत्त्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत करणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनील गायकवाड यांनी दिली.यंदाच्या वर्षी वरुणराजाने पाठ फिरवली आहे; सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.
मालेगाव तालुक्यातील दहिवाळ, टेहरे, खडकीसह इतर भागातील आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपये, संसार उपयोगी वस्तू, कपडे, भांडे आदिंचे वाटप खासदार डॉ. सुभाष भामरे, कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. अशी माहिती नगरसेवक यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज गिते, उपाध्यक्ष चेतन देसले, नगरसेवक मदन गायकवाड, सुधीर जाधव, राजेंद्र शेलारसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)