‘पाडवा पहाट’वरील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत
By Admin | Updated: November 12, 2015 00:15 IST2015-11-12T00:15:13+5:302015-11-12T00:15:46+5:30
दुर्गामाता मंदिर ट्रस्टचा उपक्रम : मदतीचा धनादेश सुपूर्द

‘पाडवा पहाट’वरील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत
नाशिक : वेगवेगळे फटाके, चविष्ट फराळ, नवीन कपडे, आकर्षक रांगोळ्या, डोळे दीपवणाऱ्या पणत्या आणि दीपावली पाडवा पहाट यांचा अनोखा संगम दिवाळीत हमखास अनुभवला जातो. दिवाळीसाठी प्रत्येकजण आपापल्या परीने सण उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु राज्यात दुष्काळाचे सावट असताना सिडको त्रिमूर्ती चौक येथील दुर्गामाता मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा दीपावली पाडवा पहाट कार्यक्रम राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती अॅड. तानाजी जायभावे यांनी दिली.
पाडवा पहाट कार्यक्रमासाठी होणारा खर्च हा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला आहे. या अंतर्गत २५ हजार रुपये किमतीचा धनादेश नाशिकचे निवासी उपजिल्हाअधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे देण्यात आला. यावेळी केशव पाटील, अॅड. तानाजी जायभावे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)