शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या कंपनीतून हेल्पर करत होता रेमडेसिविरची चोरी; पावणे दोन लाखांचे ६३ ‘रेमडेसिविर’ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 15:11 IST

आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती.

ठळक मुद्देटोळीच्या सुत्रधारास ठोकल्या बेड्यापोलिसांचा सापळा यशस्वी

नाशिक : कोरोना आजारामध्ये उपचारासाठी लागणारे ह्यरेमडेसिविरह्ण इंजेक्शनचा काळाबाजार वारंवार शहरात समोर येत आहे. आडगाव पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पालघरच्या एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात पथकाने सापळा रचून या टोळीच्या मुख्य सुत्रधारास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सुमारे १ लाख ८९ हजार रुपये किंमतीचे रेमडेसिविर इंजेक्शनच्या ६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.संशयित सिध्देश अरुण पाटील असे अटक केलेल्या म्होरक्याचे नाव आहे. त्याचे एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांसोबत लागेबांधे असल्याचीही पोलीस वर्तुळात चर्चा आहे.मागील आठवड्यात आडगाव शिवारात असलेल्या एका महाविद्यालयासमोर रेमडेसिवर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करताना तीन नर्ससह सिडकोतील एका मेडिकलमध्ये काम करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती देत संशयितांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीवरुन पोलिस रविवारी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा तीघा संशयितांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून २० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच या रेमडेसिविर काळाबाजाराचे धागेदोरे थेट पालघर जिल्ह्यात पोहचल्याचे तपासात पुढे आल्यानंतर आडगाव पोलिसांचे एक पथक पालघरला रवाना झाले.येथील एका कंपनीत संशयित सिद्धेश अरुण पाटील हा हेल्पर म्हणून काम करतो आणि त्याच्याकडून इंजेक्शनच्या बाटल्यांचा कंपनीच्याबाहेर काळ्या बाजारात पुरवठा होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, हवालदार सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरेआदींच्या पथकाने कंपनीच्या परिसरात सापळा रचला. संशयित सिध्देश यास शिताफीने पथकाने बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने नाशिकला इंजेक्शन दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६३ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. आतापर्यंत या टोळीकडून पोलिसांनी सुमारे ८५ रेमडेसिविरच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. त्यातील ६३ बाटल्यांना लेबल नसल्याने यात लेबल तयार करून देणाऱ्यादुसऱ्या संशयिताचाही सहभाग असण्याची श्यक्यता आहे. यामुळे या गुन्ह्यात आणखी संशयित निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.लवकर श्रीमंत होण्याचा 'शॉर्टकट' घेऊन गेला तुरुंगातरेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुख्य संशयित सिद्धेश पाटील हा पालघर जिल्ह्यातील एका औषध बनविण्याच्या कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीला आहे. रेमडेसिविर काळ्या बाजारात पुरवठ करणारा हा म्होरक्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने नाशिकसह अन्य काही शहरांमध्येही रेमडेसिविरचा पुरवठा केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती त्यातूनच दोघांनी संगनमत करत रेमडेसिविर इंजेक्शन गरज लक्षात घेऊन काळाबाजार करत कमी वेळेत अधिक श्रीमंत होण्याचा 'शॉर्टकट' निवडला; मात्र हा शॉर्टकट त्यांना थेट कारागृहात घेऊन गेला.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयremdesivirरेमडेसिवीरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसArrestअटकpalgharपालघर