मागे बसणाऱ्यालाही ‘हेल्मेट’ची सक्ती

By Admin | Updated: February 6, 2016 22:56 IST2016-02-06T22:55:25+5:302016-02-06T22:56:54+5:30

न्यायालयाचे आदेश : अंंमलबजावणीची गरज

The helper is also forced to sit behind | मागे बसणाऱ्यालाही ‘हेल्मेट’ची सक्ती

मागे बसणाऱ्यालाही ‘हेल्मेट’ची सक्ती

 पंचवटी : न्यायालयाच्या आदेशानुसार आता दुचाकी वाहन चालविणाराच नव्हे, तर त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची शासनाची जबाबदारी असून, सदर आदेशांचे पूर्ण पालन होण्याच्या दृष्टीने दुचाकी वाहनचालकास दुचाकी वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती (वाहन चालविण्याचा परवाना) देतेवेळी त्याच्याकडून हेल्मेटच्या वापराविषयी बंधपत्र घेऊनच त्यास सध्या अनुज्ञप्ती दिली जात आहे. न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता पूर्ण होण्यासाठी दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेटस पुरविण्याबाबत निर्देशित केले आहे. वाहन अपघातात दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तीने व त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केले असल्यास अपघाताची तीव्रता नक्कीच कमी होते त्यामुळे ही बाब विचारात घेऊन तसेच उच्च न्यायालयाने या विषयी दिलेल्या आदेशांचे पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व हेल्मेट परिधान न केल्यास होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दुचाकी वाहन चालकांनी व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने वाहन चालविताना हेल्मेट अनिवार्यपणे परिधान करावे,
असे सुचित करण्यात आले
आहे. (वार्ताहर)

Web Title: The helper is also forced to sit behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.