आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नाम फाउंडेशनद्वारे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 20:05 IST2019-06-17T20:03:50+5:302019-06-17T20:05:35+5:30
जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा होतकरू तरूण विजय गुंजाळ यांनी आर्थिक विवंचनेतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती. या विपरीत परिस्थितीत गुंजाळ परिवाराला अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन संस्थेच्या वतीने पंधरा हजार रु पये सानुग्रह मदत प्रदान करण्यात आली.

चिचोंडी बुद्रुक येथील स्व. विजय गुंजाळ यांच्या मातोश्री आशा गुंजाळ यांच्याकडे मदतीचा धनादेश देतांना सुभाष भालेराव, महेश पाटील आदी.
जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा होतकरू तरूण विजय गुंजाळ यांनी आर्थिक विवंचनेतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती. या विपरीत परिस्थितीत गुंजाळ परिवाराला अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन संस्थेच्या वतीने पंधरा हजार रु पये सानुग्रह मदत प्रदान करण्यात आली. नाम फाउंडेशनची मदत नाम फाउंडेशनचे विदर्भ खान्देश अध्यक्ष हरीश ईथापे यांच्या मार्गदर्शनाखाली धनादेशाद्वारे करण्यात आली. सदर धनादेश रविवारी (दि.१६) फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष भालेराव, महेश पाटील यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त तरु णाची आई आशा व भाऊ गौतम गुंजाळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी राजू गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, बाबासाहेब मढवई, सुनील सोनवणे, माजी उपसरपंच संगीता गुंजाळ. बन्सी गुंजाळ आदी उपस्थित होते.