शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची हमीभावाने येवल्यात तूर खरेदी वेगात

By admin | Updated: March 5, 2017 00:48 IST

येवला : नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रतिक्विंटल स्थिर भावाने तूर खरेदी सुरू करून महिना झाला

 येवला : नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ येथे ५०५० रुपये प्रतिक्विंटल स्थिर भावाने तूर खरेदी सुरू करून महिना झाला. गेल्या महिनाभरात ५०५० रु पये प्रतिक्विंटल दराने १२५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपली तूर स्वच्छ करून वाळवून तसेच सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबूक झेरॉक्स आणण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र गायकवाड, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी केले आहे.यंदा पुरेसा पाऊस आणि अनुकूल हवामान असल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने तुरीचे भाव कोसळले होते. शासनाने ५०५० रुपये हमीभाव जाहीर केला होता. तरीदेखील कमी दराने तूर विकावी लागल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. गेल्या वर्षी कमी उत्पादन असल्याने पहिल्या टप्प्यात १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तूर विकली गेली. त्यानंतर ९५०० रुपयापर्यंत तुरीचे भाव स्थिर झाले होते. यंदा मात्र खुल्या बाजारपेठेत चार हजार पाचशे रुपयापर्यंत तुरीचे भाव कोसळले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीला निम्म्यापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाला होता. यावर मलमपट्टी म्हणून फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटीच्या नियमानुसार १२ टक्के आर्द्रता, धान्याचे ग्रेडिंग, कचराविरहित तूर अशा कसोटीतून जाऊन शेतकऱ्यांच्या तुरीला ५०५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे धोरण सुरू करण्यात आले. (वार्ताहर)