बुरूड डोहावरील पूरग्रस्तांना मदत
By Admin | Updated: August 22, 2016 00:18 IST2016-08-22T00:15:09+5:302016-08-22T00:18:49+5:30
बुरूड डोहावरील पूरग्रस्तांना मदत

बुरूड डोहावरील पूरग्रस्तांना मदत
पंचवटी : अमरावतीतील विदर्भ महारोगी सेवा मंडळ व नाशिक कुष्ठपीडित बहुद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाल्मीकनगर (बुरूड डोह) येथील पूरग्रस्तांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
विदर्भ महारोगी सेवा मंडळाने व कुष्ठपीडित बहुद्देशीय सेवा संस्था यांनी पुढाकार घेत पूरग्रस्तांना कपडे, साड्या, चटई, ब्लँकेट आदि वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी नगरसेवक रुपाली गावंड, संस्थेचे अध्यक्ष हेमंत शेट्टी, सचिन घुटके, रफिक शेख, मन्सूर शेख, भालचंद्र निरभवणे, बाळू पाटील, कांचन पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)