दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी

By Admin | Updated: May 27, 2016 23:41 IST2016-05-27T23:16:50+5:302016-05-27T23:41:07+5:30

दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी

Help for drought relief | दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी

दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी

नाशिकरोड : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदतफेरी काढण्यात आली होती.
भाजयुमोच्या वतीने संपूर्ण राज्यभर दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे काम सुरू आहे. नाशिकरोड भाजयुमोच्या वतीने रविवारी बिटको चौक, जेलरोड, शिवाजी महाराज चौक, मिनीबाजार, रेल्वेस्थानक आदि परिसरातून मदत फेरी काढण्यात आली. भाजयुमो नाशिक अध्यक्ष शांताराम घंटे यांनी वैयक्तिक दहा हजार व जिल्हा इलेक्ट्रॉनिक डिलर असोसिएशनच्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश दुष्काळग्रस्तांच्या मदत निधीसाठी दिला. मदत निधी फेरीमध्ये सचिन हांडगे, अजिंक्य साने, शांताराम घंटे, प्रा. शरद मोरे, अमोल पाटील, संजय शिरसाठ, सागर टिळे, गौरव विसपुते, संजय घुले, बापू सातपुते, नवनाथ ढगे, शंकर औशिकर, लावण्य चौधरी, गोकुळ बोराडे, हेमंत नारद, हृषिकेश नारद आदि सहभागी झाले होते.

Web Title: Help for drought relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.