विघ्नहर्ता मंडळाकडून दुष्काळग्रस्तांना मदत
By Admin | Updated: January 9, 2016 00:24 IST2016-01-09T00:24:27+5:302016-01-09T00:24:36+5:30
विघ्नहर्ता मंडळाकडून दुष्काळग्रस्तांना मदत

विघ्नहर्ता मंडळाकडून दुष्काळग्रस्तांना मदत
उपनगर : प्रभाग ३१ मधील शिवसेनाप्रणीत विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेला ४१ हजार १११ रुपये निधीचा धनादेश शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ममता दिनाचे औचित्य साधून उत्तरानगर परिसरातील विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेला निधीचा धनादेश मुंबईत शिवसेना नेते अनिल देसाई यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विघ्नहर्ता मंडळाचे अध्यक्ष आशिष साबळे, धीरज शिंदे, सागर धर्माधिकारी, रामेश्वर निर्वळ, सागर पवार, शुभांगी नांदगावकर आदिंसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)