शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

विना हेल्मेट दुचाकीस्वारांची ‘शाळा’

By admin | Updated: January 12, 2017 01:06 IST

निबंधलेखन स्पर्धा : ‘फायदे कळतात; पण वळत नाही’ हे मोहिमेतून अधोरेखित

नाशिक : मुळात ज्यांनी हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करीत दुचाकी रस्त्यावर आणल्या, अशा दुचाकीस्वारांची जेव्हा वाहतूक पोलिसांनी ‘शाळा’ भरविली तेव्हा मात्र त्यांनी ‘हेल्मेट चे फायदे’ या विषयावर मुद्देसूद निबंधलेखन केले, अशा बहाद्दरांचे निबंध पोलीस अधिकाऱ्यांनी वाचले तेव्हा तेदेखील अवाक् झाले. हेल्मेटविषयीचे ज्ञान असून त्याच्या वापराकडे दुर्लक्ष नाशिककर का करतात, असा प्रश्न यावेळी पोलिसांना पडला. ‘हेल्मेटमुळे संरक्षण होते’, ‘अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होत नाही’, ‘हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचते’, ‘वायू प्रदूषणापासून संरक्षणासाठी हेल्मेट उत्तम...’ असे मत शाळकरी विद्यार्थ्यांनी नोंदविले तर त्यात नावीन्य नाही; मात्र हे विचार जे नाशिककर हेल्मेट वापरत नाही त्यांनी स्वत:च्या शब्दांमध्ये व्यक्त केले हे विशेष! निमित्त होते, ‘त्या’ नाशिककरांसाठी वाहतूक पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावरील निबंध स्पर्धेचे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन व त्याबाबत जनजागृती करण्यावर शहर वाहतूक विभागाकडून भर दिला जात आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि. ११) सकाळी मुंबई नाका येथे असाच एक प्रबोधनपर अभिनव उपक्रम निबंध स्पर्धेच्या माध्यमातून राबविला. नाशिककरांना ‘हेल्मेट’ कळतेय पण वळत नाही, असे यावेळी अधोरेखित झाले.हेल्मेटचा वापर कायद्याने बंधनकारक आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हेल्मेटच्या वापरामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत  होते.  नागरिकांनी किमान आपला व आपल्या कुटुंबीयांचा विचार करून हेल्मेटचा वापर दुचाकी चालविताना करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांनी यावेळी वर्गात केले. सहायक आयुक्त जयंत बजबळे, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, शंकर काळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)