हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना हेल्मेटची राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:30 IST2018-08-28T00:30:26+5:302018-08-28T00:30:54+5:30
हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणा-या चालकांना हेल्मेटच्या स्वरूपातील राखी बांधून ओवाळणी म्हणून हेल्मेट वापरण्याचे वचन घेत शहरात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले़

हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना हेल्मेटची राखी
नाशिक : हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणा-या चालकांना हेल्मेटच्या स्वरूपातील राखी बांधून ओवाळणी म्हणून हेल्मेट वापरण्याचे वचन घेत शहरात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले़ अर्थात हा आगळा-वेगळा उपक्रम रनिंग सिटी इव्हेंट्स, कॉलेज स्टुडंट्स न्यूज नेटवर्क आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला़ त्र्यंबक रोडवरील शरणपूर सिग्नल, एबीबी सिग्नल आणि गंगापूर रोडवरील जेहान सिग्नल या तीन ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला़ दुचाकी अपघात व त्यामध्ये मृत्यू होणाºया युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ दुचाकीचालकांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती व्हावी यासाठी रविवारी हा उपक्रम शहरात राबविण्यात आला़ विना हेल्मेट दुचाकी चालविणाºयास हेल्मेट स्वरूपातील राखी बांधली जात होती़ तर ओवाळणी स्वरूपात हेल्मेट परिधान करण्याचे वचन घेतले जात होते़ याबरोबरच पोस्टर स्वरूपात हेल्मेटचे महत्त्व, वाहतूक नियम आणि हेल्मेट वापराबद्दल जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामध्ये रनिंग सिटी इव्हेंट्सच्या आरती मंत्री, रवि गांगुर्डे, भारत लाटे, गोदावरी देवकाते, वीरेंद्र देशमुख तसेच नीलेश माळोदे, चैतन्य पाटील, नमिरा पिरजादे, नितीन पगारे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलदास भोये, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माळी तसेच कर्मचारी सहभागी झाले होते़