हेल्मेट सक्ती जाचक; इतर नियमांचे काय?
By Admin | Updated: October 25, 2015 23:23 IST2015-10-25T23:21:46+5:302015-10-25T23:23:01+5:30
नाशिककरांचा संतप्त सवाल : ढीगभर वाहतूक नियमांची पायमल्ली होत असताना केवळ हेल्मेटचीच सक्ती कशासाठी?

हेल्मेट सक्ती जाचक; इतर नियमांचे काय?
नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता सुरक्षा समितीने वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नाशिककरांनी हेल्मेटची सक्ती मोडून काढली आहे. आता तर अगदी शॉर्ट नोटीसवर नाशिककरांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, अगोदर पोखरलेली वाहतूक यंत्रणा सुधारा मग सक्ती करा, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे...
व्हायरल झालेला मॅसेज असा...प्रिय नाशिक पोलीस,
आधी शहरात चालू असलेले खून-दरोडे, अपहरण, खंडणी, मटके, जुगार, सट्टा यांचे सत्र रोखा; मग हेल्मेट सक्तीच्या
नावाखाली सामान्य जनतेला वेठीला धरा...
शहरात शांतता प्रस्थापित झाली, तर सुज्ञ नाशिककर चिलखत घालूनही गाडी चालवायला तयार आहे...
या आधी ८ ते १० वर्षांपूर्वी असेच वेठीला धरून हेल्मेटविक्री खूप मोठ्या प्रमाणावर करून घेतली व नंतर
परत कोणी विचारले पण नाही...
आता हेल्मेट कंपन्या कोणाच्या नातेवाइकाच्या आहेत? यात कोणाकोणाचा फायदा होणार आहे? आणि कोणाला त्रास होणार आहे?
- एक त्रस्त नाशिककर