शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो, प्रभाग सभा आहे, या ना लवकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:42 IST

पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभेची ही औपचारिकता तरी कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे किती सदस्यांना प्रभागातील विविध विकासकामांची पोटतिडीक आहे हे यावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्देसभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते.सभेच्या वेळेवर कोणी सदस्य उपस्थित राहत नाहीजीन सुफियान यांची अद्याप एकदाही उपस्थिती नाही

संजय शहाणे।इंदिरानगर : पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभेची ही औपचारिकता तरी कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे किती सदस्यांना प्रभागातील विविध विकासकामांची पोटतिडीक आहे हे यावरून दिसून येत आहे.नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढविणाºया प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक सभांमध्ये नागरी प्रश्नांवर आवाज उठवू असाच वादा केला होता. मात्र प्रत्यक्षात प्रभाग समितीत त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत नाही.  दर महिन्याला प्रभाग समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे. परंतु यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हापासून पूर्व प्रभाग सभेचे दुर्भाग्य आहे की सभेच्या वेळेवर कोणी सदस्य उपस्थित राहत नाही. अशावेळी प्रभाग सभापतींनाच कोरम पूर्ण करण्यासाठी सदस्यांना फोन करून सभेस येण्यासाठी बोलवावे लागते. नेहमीच कोरम पूर्ण होण्यासाठी सुमारे अर्धा ते एक तास सभेस उशीर होत असल्याने अधिकारी खोळंबतात आणि नागरिकांची कामेही रखडतात. त्यामुळे सभेचे महत्त्व किती आहे याची जाणीव सदस्यांना नाही असे दिसून येते.मनपाच्या उपस्थिती पत्रकावरून व प्रत्यक्ष पाहणीवरून आतापर्यंतची कामगिरी बघितली तर सभापती शाहीन मिर्झा, सतीश सोनवणे, श्याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, रूपाली निकुळे, सुषमा पगारे, आशा तडवी, सुमन भालेराव, अर्चना थोरात आधी सदस्य नियमिपणे सभेला उपस्थित राहतात. चंद्रकांत खोडे, सुप्रिया खोडे, अनिल ताजनपुरे, सतीश कुलकर्णी आदी सदस्य अधूनमधून प्रभागाला उपस्थित राहतात. उपमहापौर प्रथमेश गिते, शोभा साबळे, समिना मेमन, सय्यद मुशीर, राहुल दिवे आदींची एक ते दोन वेळा उपस्थिती आहे, तर जीन सुफियान यांची अद्याप एकदाही उपस्थिती दिसलेली नाही. काही नगरसेवक अशा सभेला येणे कमीपणाचे मानतात. आपले काम कसेही होते असे त्यांचा पवित्रा असतो. या उलट अनेक नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरतात आणि कामेही करून घेतात. परंतु बहुतांशी सभा त्याच त्या विषयावर गाजतात. त्यातून फारसे काही हाती पडत नसल्याने नगरसेवक बैठक टाळतात, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक