येवल्यात जोरदार पावसाची हजेरी

By Admin | Updated: September 22, 2016 22:51 IST2016-09-22T22:51:31+5:302016-09-22T22:51:54+5:30

रब्बीच्या आशा पल्लवित : गहू, हरभरा, उन्हाळी कांदा पिकाचे क्षेत्र वाढणार

Heavy showers in Yeola | येवल्यात जोरदार पावसाची हजेरी

येवल्यात जोरदार पावसाची हजेरी

नाशिक : येवला व तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. खामखेडा परिसरात झालेल्या उत्तराच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुसळधार पाऊस
येवला : मुखेड परिसरात दुपारी दोन-अडीचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली, तर सुमारे एक ते सव्वा तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने बाजरी, कांदा रोपाचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. नुकतीच लाल कांद्याची लागवड केली असून, कांद्यात पाणीच पाणी झाले आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस उशिरापर्यंत चालू होता.
खामखेडा परिसरात झालेल्या उत्तराच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्तराच्या परतीच्या पावसाने जोरदार पाऊस आल्याने खरिपाच्या पिकाना जीवदान मिळाले. या उत्तराच्या पावसामुळे नाल्याना पूरपाणी आल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यात राज्य सरकारने शेतीसाठी तीन महिने बारा तास अखंड विद्युत पुरवठा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आला. त्यामुळे पिकाना पाणी देता येत आहे.
उत्तराच्या पावसामुळे व अजूनही पावसाचे दिवस असल्याने या परतीच्या पावसामुळे खरिपातील गहू, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यामुळे खरिपाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा अंदाज व्यक्त होताना दिसून येत आहे.
(लोकमत चमू)

Web Title: Heavy showers in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.