शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा बेफाम पाऊस, रस्त्यातील खड्डे आणि प्रशासनाला लागले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 23:59 IST

यंदाचा पावसाळा वेगळाच आहे. प्रत्येक महिन्यात दमदार पाऊस कोसळला. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झाला आहे. ढगफुटीसदृश, अतिवृष्टी, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. राज्य सरकारने तिजोरी खुली केली असल्याने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. पण पाऊस एवढा आहे की, खरीप हंगाम पाण्यात गेला. हाताशी आलेली पिके सडली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. मदत देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यात केली. अतिवृष्टीमुळे रस्ते, महामार्गांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यंत्रणा खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेते आणि लगेच पाऊस कोसळतो, अशी स्थिती झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे. पाऊस थांबत नाही आणि दुरुस्ती करता येत नाही, अशी गत प्रशासनाची झाली आहे. खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या जनतेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचे फटके मालेगावात तसेच नाशिक-मुंबई रस्त्याची देखभाल करणाऱ्या न्हाईला बसले.

ठळक मुद्देमहामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांचा अल्टिमेटम फलदायी ठरणार काय?टोलनाका बंद होणार?मालेगावातील नुरा कुस्तीग्रामपंचायतीतही घराणेशाहीयुवराजांची राजकीय भूमिका

मिलिंद कुलकर्णी यंदाचा पावसाळा वेगळाच आहे. प्रत्येक महिन्यात दमदार पाऊस कोसळला. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये झाला आहे. ढगफुटीसदृश, अतिवृष्टी, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक ठिकाणी झाला. राज्य सरकारने तिजोरी खुली केली असल्याने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. पण पाऊस एवढा आहे की, खरीप हंगाम पाण्यात गेला. हाताशी आलेली पिके सडली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. मदत देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या दौऱ्यात केली. अतिवृष्टीमुळे रस्ते, महामार्गांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. यंत्रणा खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेते आणि लगेच पाऊस कोसळतो, अशी स्थिती झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे. पाऊस थांबत नाही आणि दुरुस्ती करता येत नाही, अशी गत प्रशासनाची झाली आहे. खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या जनतेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचे फटके मालेगावात तसेच नाशिक-मुंबई रस्त्याची देखभाल करणाऱ्या न्हाईला बसले.टोलनाका बंद होणार?नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा विषय १० ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला. महामार्गावर खड्डे पडल्यास ७२ तासांत देखभाल व दुरुस्तीचे काम असणाऱ्या टोल कंपनीच्या यंत्रणेने बुजविण्याची तरतूद असल्याची आठवण पालकमंत्री दादा भुसे यांनी करुन दिली. १५ दिवसांत महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास टोलनाके बंद करण्याचा अल्टिमेटम पालकमंत्र्यांनी दिला आहे. दोन दिवसांनी अल्टिमेटमची मुदत संपणार आहे. मात्र खड्डे काही बुजवले गेले नाही, हे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आले. त्यांनीही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनीही ३१ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. खड्डे न बुजविल्यास टोलनाके बंद करण्याचा इशारा दिला आहे. आजी आणि माजी पालकमंत्री यांनी टोकनाक्यांविषयी एक सूर लावल्याने खरोखर नाके बंद होतात की खड्डे बुजविले जातात, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे.मालेगावातील नुरा कुस्तीमालेगावात आमदार मौलाना मुफ्ती व माजी आमदार रशीद शेख यांच्यात संघर्ष सुरू आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या दोघांच्या संघर्षाकडे पाहता येईल. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असतानाही रशीद शेख व तत्कालीन महापौर ताहेरा शेख यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. मात्र सत्ता परिवर्तन घडले आणि समीकरण बदलले. आमदार मुफ्ती यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशी जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले. विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्यात गैर काय, असा टीकाकारांना प्रतिसवाल त्यांनी केला. रशीद शेख यांच्या राजकीय कारकिर्दीला ४० वर्षे पूर्ण झाली म्हणून नागरी सत्काराला अजित पवार व जयंत पाटील आले. त्यापाठोपाठ आमदारांनी महापालिकेच्या प्रश्नांवरून रास्ता रोको आंदोलन केले. महापालिका आयुक्तांवर गटारीचे पाणी फेकण्याचा प्रकार घडला. जनतेच्या हितासाठी ही लढाई आहे की, स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नुरा कुस्ती चालली आहे, हे यथावकाश लक्षात येईल.ग्रामपंचायतीतही घराणेशाहीघराणेशाहीचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केल्यापासून त्याची चर्चा गल्ली ते दिल्ली होत आहे. चर्चा होत असली तरी हा अपरिहार्य विषय असल्याच्या मानसिकतेत राजकीय नेते व पक्ष असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले. सत्ता कोणत्याही स्थितीत आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या ताब्यात रहावी, यासाठी नेते प्रयत्नशील राहिले. वर्षानुवर्षे गड राखला जातो, याचा अर्थ परिस्थितीनुरूप हे नेते भाकरी फिरवत आहेत, असाच काढला जातो. पेठ तालुक्याचे उदाहरण घेऊया. भास्कर गावीत यांचे पुत्र श्याम हे राजबारी, दामू राऊत यांचे पुत्र दिलीप हे माळेगाव, विशाल जाधव यांच्या पत्नी गीता या आसरबारी या गावातून निवडून आल्या. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मातब्बर नेत्यांची ही स्थिती आहे. इगतपुरीत रतनकुमार इचम, ज्ञानेश्वर लोंढे, पांडुरंग खताळे, तर सुरगाण्यात जे. पी. गावित व आमदार नितीन पवार यांनी आपापले गड राखले.युवराजांची राजकीय भूमिकाराज्यसभेची संधी हुकल्यानंतर राजकीय पक्षांपासून फटकून वागणाऱ्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आता जुळवून घेण्याचे ठरविलेले दिसतेय. या आठवड्यात कोल्हापुरात हसन मुश्रीफ या राष्ट्रवादी नेत्यासोबत व्यासपीठावर दिसलेले युवराज दोन दिवसांनी नाशकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि रोजगार व प्रशिक्षणाचा विषय मार्गी लावायचा असेल तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे युवराजांनी हे पाऊल उचलले असावे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले आहे. राज्यभर फिरून संवाद व संपर्क अभियान राबविले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या राज्यव्यापी दौऱ्याने मराठा समाजात आरक्षणाप्रती जनजागृती केली. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMalegaonमालेगांवgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार