मालेगाव परिसरात वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:34+5:302021-05-01T04:14:34+5:30
सौंदाणेसह परिसरातही सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या ...

मालेगाव परिसरात वादळी पाऊस
सौंदाणेसह परिसरातही सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली. वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर वीज गायब झाल्याने संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.
कशीबशी कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. सौंदाणे परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. काढणीस आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी वर्गाचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा अडचणीत आणले आहे.