जोरदार पावसाने कोनांबेत रस्ता गेला वाहून

By Admin | Updated: July 14, 2016 00:45 IST2016-07-14T00:18:43+5:302016-07-14T00:45:35+5:30

जोरदार पावसाने कोनांबेत रस्ता गेला वाहून

Heavy rains led to a road in Cornwall | जोरदार पावसाने कोनांबेत रस्ता गेला वाहून

जोरदार पावसाने कोनांबेत रस्ता गेला वाहून

 कोनांबे : सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. कोनांबे-पापल्याची वाडी रस्त्यावरील लगनधोंडी मळा परिसरातील मोऱ्या व रस्ता पुराच्या लोंढ्यात वाहून गेला आहे.
गेल्या वर्षी या नाल्यात अपघात होऊन महिलेला मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून याठिकाणी रस्ता करून पाइपलाइन टाकून मोरी तयार केली होती. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सदर रस्ता व मोरीतील पाइप वाहून गेले. त्यामुळे लगनधोंडी मळा भागातील शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे.
दरम्यान, कोनांबे धरण ओसंडून वाहू लागले आहे. देवनदी प्रवाहित झाल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (वार्ताहर)कोनांबे-पापल्याची वाडी रस्त्यावरील मोरी वाहून गेल्याने लगनधोंडीमळा परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

Web Title: Heavy rains led to a road in Cornwall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.