अभोणा परिसरात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:51 PM2020-09-06T18:51:34+5:302020-09-06T18:52:14+5:30

अभोणा : रविारी (दि.६) दुपारी अडीचच्या सुमारास शहरासह परिसरात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Heavy rains lashed the area. | अभोणा परिसरात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली

अभोणा परिसरात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली

Next
ठळक मुद्देपावसामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

अभोणा : रविारी (दि.६) दुपारी अडीचच्या सुमारास शहरासह परिसरात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली.
वातावरणात बदल होऊन मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सुमारे तासभर झालेल्या पावसाने सर्व रस्ते जलमय झाले होते. तर काही मुख्य ठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचले होते.पावसामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे आजच्या मुसळधार पावसाने परिसरातील शेकडो एकर शेतातील मका सोयाबीन,भात, बाजरी आदी पीकांचे भरपूर नुकसान झाले आहे. तर पश्चिम आदिवासी पट्यात पळसदर सुकापूर, लिंगामा, मोहपाडा, आमदर, वडाळा, देवळीकराड आदी गावातील लावणी झालेल्या स्ट्रॉबेरी रोपांना मोठा फटका बसला आहे. मिरची, टोमॅटो तसेच भाजीपाला पिकांचेही शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बरेच नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कसमादेसाठी जीवनवाहीनी असलेल्या चणकापूर धरणात सकाळी ९४ टक्के पाणीसाठा झाला असून गिरणा नदीपात्रातून ८८१ क्सुसेस तर चणकापूर उजव्या कालव्यातून १२० क्सुसेस विसर्ग सुरू होता. मात्र धरण लाभक्षेत्र परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे दुपारी ४ वाजता गिरणा नदीपात्रातून १७६२ क्सुसेस विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुनंद (अर्जुनसागर) प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा झाला असून ६६० क्युसेस विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गिरणा, तांबडी, पुनंद या नघांच्या परिसरात
पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी सोडण्यात येणार असल्याची शक्यता सत्रांनी वर्तविली आहे. (फोटो ०६ अभोणा)

Web Title: Heavy rains lashed the area.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.