शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

येवला परिसरात वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:57 IST

येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे.

ठळक मुद्देशेतीपिकांचे नुकसान : वीज कोसळून बैल मृत्युमुखी

येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे.शनिवारी, (दि. २९) सकाळपासूनच वातावरण बदललेले होते. वाढत्या उष्म्यात दुपारच्या सुमारास जोरदार सोसाट्याचा वारा सुटला. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरीही कोसळायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने ग्रामीण भागात शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली तर शहरातील अनेक ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत होते.शहरासह केळम बुद्रुक, धामोडे, वडगाव बल्हे, अंदरसुल, निमगाव मढ, साताळी आदी ठिकाणी घरांची पडझड होऊन झाडेदेखील पडल्याने नुकसान झाले आहे. रेंडाळे, पारेगाव येथेही वादळी पावसाने नुकसान झाले आहे.शहरातील विंचूर रोडवरील एका घराजवळ वीज कोसळली. घराचा कोपरा या विजेने कोसळला असला तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर उमेश अट्टल, संतोष अट्टल या कांदा व्यापाऱ्यांच्या दोन शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा पावसाने भिजला. यामुळे अट्टल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील लौकी शिरस येथे वीज पडून जगदीश जनार्दन कानडे यांचा बैल मृत्युमुखी पडला आहे. निमगाव मढ येथील बाबासाहेब आसाराम लभडे यांचा एक एकर कारल्याची बाग पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साताळी येथील सखाहरी पांडुरंग निकम यांचे घर पडले तर मातुलठाण येथील शिवाजी विश्‍वनाथ नागरे यांचे घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. नगरसुल येथील वडाचा मळा येथील सीताराम गोविंद पैठणकर, किरण विष्णू पैठणकर यांच्या कांदा चाळीवर झाड कोसळल्याने कांदा चाळीसह साठवलेल्या कांद्याचे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दत्तात्रय काशिनाथ पगारे यांच्या राहत्या घरावर सोलर सेट व झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. राजापूर येथे वीज पडल्याने चारा जळाला आहे. कोळम बुद्रुक येथील भानुदास बाळकृष्ण कदम यांचे घरावरील पत्रे उडाले.दरम्यान, नुकसानीची माहिती व पंचनामे करण्याचे काम महसूल यंत्रणेकडून सुरू आहे.फोटो- २९ येवला रेन १ ते ५

टॅग्स :yevla-acयेवलाRainपाऊस