वणी : ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर सहाव्या माळेला जोरदार पाऊस झाल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्र उत्सवाचे अंतिम सत्र सुरु असुन शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. सकाळपासुन वातावरण स्वच्छ व आकाश निरभ्र होते. दर्शनासाठी बाऱ्याही लागल्या होत्या. रोपवे केंन्द्रातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ट्रॉलीमधे बसण्यासाठी प्रतिक्षा भाविक करत होते. दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारास गडावर जोरदार पावसास प्रारंभ झाला. दोन तासापेक्षा अधिक वेळेपर्यंत पाऊस सुरुच होता. अनपेक्षितपणे वरु णराजाने हजेरी लावल्याने भाविकांनी पावसापासुन संरक्षण मिळावे यासाठी प्रसादाची दुकाने हॉटेल्स रस्त्याच्या कडेला काही घरालगत भागाचा आसरा घेतला पाऊस सुरु होता. त्यावेळी राममंदीरापर्यंत बाºया लागलेल्या होत्या. दरम्यान गडावर धोंड्या कोंड्याच्या विहीरीजवळ तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. मंदीर परिसरापासुन हे अंतर एक किलोमीटरच्या पुढे आहे. या अंतरात निवारा शेडची व्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण अशा ऐनवेळी येणाºया पावसाचा फटका भाविकांना बसतो. एक कीलोमीटर अंतर पायी येणारे अनेक भाविक ओलेचिंब झाले तर रस्त्यालगत विविध दुकाने लावणाºया दुकानदारांनाही याचा फटका बसला. दरम्यान ग्रामपालिकेच्या माध्यमातून २५ कोटी रु पयांच्या निवारा शेडचा ठीकठिकाणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच राजेश गवळी यांनी दीली. दरम्यान नवरात्र कालावधीत मागील वर्षापेक्षा यावर्षी तुलनात्मक भाविकांची हजेरी कमी आहे. त्यात पावसाच्या हजेरीमुळे गुंतवणुक करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत.
सप्तशृंगगडावर मुसळधार पाऊस, भाविकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:31 IST