येवला तालुक्यात शेतपिकांचे मुसळधार पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:27 PM2020-09-07T19:27:07+5:302020-09-07T19:27:46+5:30

येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, धमोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Heavy rains damage crops in Yeola taluka | येवला तालुक्यात शेतपिकांचे मुसळधार पावसाने नुकसान

येवला तालुक्यात शेतपिकांचे मुसळधार पावसाने नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देमुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, धमोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणातील उष्मा वाढलेला असून दुपारच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. अकस्मातपणे धडकणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
तालुक्यातील टोमॅटो, मका, बाजरी, मूग, भुईमूग आदी प्रमुख पिकांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. काही ठिकाणी मका, बाजरी पिक भुईसपाट झाली असून काही ठिकाणी कांदा रोप वाहून गेले आहे. शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास अकस्मात होणाºया पावसाने हिरावला जातो की काय, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
चौकट...
येवला तालुक्यात झालेला पाऊस
येवला : ३३ मि.मि.
अंदरसुल : ११ मि.मि.
नगरसुल : ३५ मि.मि.
पाटोदा : ११ मि.मि.
सावरगाव : १९ मि.मि.
जळगाव नेऊर : ६ मि.मि.
एकूण पाऊस : १०५ मि.मि.
सरासरी : १७.५ मि.मि.
एकूण सरासरी : ३६०.३० मि.मि.
(फोटो०७ येवला))

Web Title: Heavy rains damage crops in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.