इगतपुरी : मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून मनमाड मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, दादर नागपूर सेवग्राम एक्सप्रेस, दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रद्द केलेल्या असून काही गाड्या अनिश्चित वेळेवर धावत असून काही गाड्या विविध रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.इगतपुरी रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ स्थानकावरच थांबविण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. अनेक प्रवाशांनी स्थानकाबाहेर येऊन खाजगी वाहनांनी मुंबईकडे जाणे पसंत केले. तर शहर परीसरातही मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरु असुन रात्री उशिरा पर्यंत पावसाचा जोर वाढतच आहे.
मुसळधार पावसामुळे इगतपुरीत रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 00:22 IST
इगतपुरी : मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून मनमाड मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, दादर नागपूर सेवग्राम एक्सप्रेस, दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रद्द केलेल्या असून काही गाड्या अनिश्चित वेळेवर धावत असून काही गाड्या विविध रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे इगतपुरीत रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम
ठळक मुद्देइगतपुरी रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ स्थानकावरच