वणी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी; पत्रे उडाले, छत कोसळून तीन जखमी

By Admin | Updated: May 28, 2014 01:01 IST2014-05-26T21:28:19+5:302014-05-28T01:01:23+5:30

वणी : सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह वणी व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. परिसरात गारांचाही पाऊस झाला. वादळी पावसामुळे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकेच्या घराच्या पत्रे उडाले, तर छतावरील पिओपीचे सिलिंग कोसळून तिघे जखमी झाले, तर दैव बलवत्तर म्हणून चार महिन्यांची बालिका बचावली. अंबनेर येथे कांद्याचे शेड जमीनदोस्त होऊन हजारो रुपयांचे कांदे भुईसपाट झाले, तर कोडच्या आश्रयाखाली असणार्‍या जीपचे नुकसान झाले.

Heavy Rainfall in Wani Area; The letters broke, the roof collapsed and three wounded | वणी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी; पत्रे उडाले, छत कोसळून तीन जखमी

वणी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी; पत्रे उडाले, छत कोसळून तीन जखमी

वणी : सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह वणी व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. परिसरात गारांचाही पाऊस झाला. वादळी पावसामुळे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकेच्या घराच्या पत्रे उडाले, तर छतावरील पिओपीचे सिलिंग कोसळून तिघे जखमी झाले, तर दैव बलवत्तर म्हणून चार महिन्यांची बालिका बचावली. अंबनेर येथे कांद्याचे शेड जमीनदोस्त होऊन हजारो रुपयांचे कांदे भुईसपाट झाले, तर कोडच्या आश्रयाखाली असणार्‍या जीपचे नुकसान झाले.
वातावरणातील उष्मा व अस‘ उकाडा असे वातावरण असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह तुफान गारांची पर्जन्यवृष्टी झाली. यात पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका यांचे घराचे पत्रे उडाले, तर छतावरील पीओपी सिलिंग व प˜्या अंगावर पडून रंजना देवीदास जेटे, सुरेश एकनाथ यावले, हेमलता संतोष पांडे हे तिघे जखमी झाले. स्वरा संतोष पांडे ही चार महिन्यांची बालिका दैव बलवत्तर म्हणून बचावली.
वणी येथे पत्रा अंगावर पडून वसंत बापू शिंदे (वय ३५, रा. वणी) हे जखमी झाले, तर अंबानेर शिवारात अहिरे यांचे शेतजमिनीत दहा गंुठ्यात असणारे कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले.
पावसापासून बचावासाठी उभ्या केलेल्या जीपचे नुकसान झाले. तसेच परिसरात अनेक घरांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Heavy Rainfall in Wani Area; The letters broke, the roof collapsed and three wounded